#INDvsAUS 3rd test: तिसरी कसोटी सिडनीत होणार
![#INDvsAUS 3rd test: The third test will be in Sydney](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/भारत-विरुद्ध-ऑस्ट्रेलिया-सिडनी.png)
सिडनी – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनीत होणार असलेली तिसरी कसोटी मेलबर्नमध्येच खेळविण्याची तयारी सुरू होती. मात्र मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्यानंतर ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने नव्याने परिस्थितीचा आढावा घेतला असून आता अखेर तिसरी कसोटी सिडनीतील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळविण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार सिडनी कसोटी ७ जानेवारी २०२१ पासून सुरू होत आहे. ही कसोटी ७ ते ११ जानेवारी या कालावधीत खेळवली जाणार असून भारतीय वेळेनुसार दररोज पहाटे ५ वाजल्यापासून थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे. यानंतर चौथी कसोटी १५ ते १९ जानेवारी या कालावधीत ब्रिस्बेनच्या द गाबा ब्रिस्बेन येथे खेळवली जाणार आहे.
दरम्यान, अॅडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाचा आणि मेलबर्न कसोटीत भारताचा विजय झाला. यामुळे चार कसोटी सामन्यांच्या ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ स्पर्धेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे आता मालिका जिंकण्याच्या दृष्टीने सिडनी आणि ब्रिस्बेन या दोन्ही कसोटी सामन्यांना महत्त्व आहे.