breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

#INDvsAUS राष्ट्रगीत सुरु असताना सिराजला कोसळलं रडू

सिडनी – ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. आज कसोटीचा पहिला सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय खेळाडू मोहम्मद सिराज याचा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. राष्ट्रगीतावेळी सिराज भावूक झाला होता. यावेळी त्याच्या डोळ्यातून अश्रू कोसळले. तेव्हा सप्रीत बुमराहने त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. सिराजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही आपल्या अधिकृत ट्विटरवर हा भावनिक क्षण पोस्ट केला आहे.

सिराजने मेलबर्न येथील कसोटीत पदार्पण केलं होतं. पदार्पणातच त्याने आपल्या कामगिरीने सर्वांची मनं जिंकली. आज तिसऱ्या कसोटी सामन्यातही गोलंदाजी करताना सिरजाने भारतीय संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. त्याने ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर याला स्वस्तात बाद केले. सिरजाच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात वॉर्नर पुजाराकडे झेल देऊन माघारी परतला.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना मोहम्मद सिराजच्या वडिलांचं भारतात अल्पशा आजाराने निधन झालं. भारताकडून क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारा आधारवड हरपल्याने सिराजवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. परंतु यातून सावरत त्याने भारतीय संघासोबत राहून वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आपल्याला मिळालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने आश्वासक मारा करत स्वतःची निवड सार्थ ठरवली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button