पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप; सर्वपक्षीय मातब्बर नेत्यांचा भाजपात जाहीर प्रवेश!
मिशन- PCMC : भाजपा आमदार महेश लांडगे यांचा राष्ट्रवादीवर ‘‘सर्जिकल स्ट्राईक’’

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बारामती गेस्टहाउसमध्ये प्रवेश करुन घेतला. याला जोरदार प्रत्युत्तर देत भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे आज सर्वपक्षीय 22 दिग्गजांचा भाजपात प्रवेश करण्यात आला.
महापालिका निवडणूक आचार संहिता सुरू झाली आहे. दि. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि दि. 16 जानेवारी रोजी निकाल घोषीत होईल. महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार आहेत. शहरात राजकीय दिवाळी सुरू झाली असून, अजित पवारांनी वाजवल्या ‘टिकल्या’; तर महेश लांडगेंनी लावला ‘सुतळी बॉम्ब’ असे निरीक्षण राजकीय जाणकरांनी नोंदवले आहे.
विशेष म्हणजे, प्रवेशांसाठी कोणत्याही स्थानिक नेत्याला पक्षश्रेष्ठींकडे विशेष ‘फिल्डिंग’ लावावी लागली नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या काळात शहरातील निर्णय शहरात होतात, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आमदार महेश लांडगे यांनी भाजपा पिंपरी-चिंचवड शहराचे नेते म्हणून राष्ट्रवादीला अक्षरश: घायाळ केले आहे. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा मोठा ‘सपोर्ट’ असल्याचे सिद्ध झाले आहे.

हेही वाचा : रिक्षावाला वाट बघतो पण आणि वाट लावतो पण..; एकनाथ शिंदेंची टोलेबाजी
भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या मान्यवरांची यादी पुढीलप्रमाणे :
१) माजी महापौर उभाठा गटाचे नेते – श्री संजोगजी वाघेरे पाटील
२) माजी अध्यक्ष, स्थायी समिती – सौ. उषाताई वाघेरे
३) राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष – श्री प्रशांत शितोळे
४) राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते – श्री विनोद नढे
५) राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर – श्री प्रभाकर वाघेरे
६) माजी उपमहापौर – श्री राजू मिसाळ
७) उभाठा गटाचे नगरसेवक – श्री अमित गावडे
८) उभाठा गटाच्या नगरसेविका – सौ. मीनलताई यादव
९) श्री रवी लांडगे
१०) माजी नगरसेवक – श्री संजय नाना काटे
११) राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका – सौ. आशाताई सूर्यवंशी
१२) श्री प्रविण भालेकर
१३) श्री जालिंदर बापु शिंदे
१४) श्री सचिन सानप (स्वतः व पत्नी)
१५) श्री दादा सुखदेव नरळे (स्वतः व पत्नी)
१६) श्री सदगुरु कदम
१७) श्री समीर मासुळकर (स्वतः व पत्नी)
१८) डॉ. श्री सुहास कांबळे
१९) श्री कुशाग्र कदम
२०) श्री अशोक मगर
२१) श्री नागेश गवळी
२२) श्री प्रसाद शेट्टी – माजी नगरसेवक.
२३) श्री नवनाथ जगताप – माजी स्थायी समिती अध्यक्ष.
२४) श्री प्रभाकर वाघेरे – माजी उपमहापौर.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2025-26 च्या निमित्त शहरातील सर्वपक्षीय मातब्बर नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्तवाखाली आणि प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला. सर्व पिंपरी-चिंचवडकर मान्यवरांचे भाजपा परिवारात हार्दिक स्वागत करतो. देव-देश-धर्म अन् संस्कृतीसाठी कटिबद्ध राहून पिंपरी-चिंचवडमध्ये ’’विकासाभिमूख हिंदुत्वाच्या’’ पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टी निर्विवाद विजय मिळवण्याचा निर्धार आम्ही केला आहे. .
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.





