झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, मराठमोळा तुषार देशपांडेही भारतीय संघात
IND vs ZIM | भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे आणि या दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाचा समालवीर शुबमन गिल याला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघाचा नवा कर्णधार बनवले गेले आहे. दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जाणार आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी युवा खेळाडूंचा संघ निवडला गेला आहे. रियान पराग, अभिषेक शर्मा, नितिश कुमार रेड्डी व तुषार देशपांडे यांना झिम्बाब्वे दौऱ्यावर पदार्पणाची संधी मिळणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये निवड झालेल्या पण बाकावर बसून राहिलेल्या संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, आवेश खान व शुबमन हे झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहेत.
हेही वाचा – ‘पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी बांबू लागवडीस प्राधान्य द्यावे’; प्रधान सचिव प्रविण दराडे
मालिकेचं वेळापत्रक :
- पहिली टी-२० : ६ जुलै
- दुसरी टी-२० : ७ जुलै
- तिसरी टी-२० : १० जुलै
- चौथी टी-२० : १३ जुलै
- पाचवी टी-२० : १४ जुलै
(सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेचार वाजता सुरु होतील.)
भारताचा संघ :
शुबमन गिल ( कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलिल अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे.