breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा! विराट, रोहितला विश्रांती

IND vs SA : भारतीय संघ येत्या डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ दोन कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्याची सुरुवात १० डिसेंबर रोजी तीन सामन्यांच्या टी-२० सामन्याने होईल.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव टीम इंडियाचे नेतृत्व करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर के.एल. राहुलकडे वन डेचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

भारताचा कसोटी संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा.

भारताचा एकदिवसीय संघ :

ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, अविनाश कुमार, अर्शदीप सिंग, दीपक चाहर.

हेही वाचा  –  खासदारांना हिवाळी अधिवेशनात ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम’ घोषणाबाजी करता येणार नाही! 

भारताचा टी-20 संघ :

यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुनील, रवींद्र जडेजा. कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर.

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा वेळापत्रक

१० डिसेंबर २०२३ : पहिला टी -२० सामना, डर्बन
१२ डिसेंबर २०२३ : दुसरा टी -२० सामना, ग्केबेरहा
१४ डिसेंबर २०२३ : तिसरा टी -२० सामना, जोहान्सबर्ग
१७ डिसेंबर २०२३ : पहिला वनडे सामना, जोहान्सबर्ग
१९ डिसेंबर २०२३ : दुसरा वनडे सामना, ग्केबेरहा
२१ डिसेंबर २०२३ : तिसरा वनडे सामना, पार्ल
२६ ते ३० डिसेंबर, २०२३ : पहिला कसोटी सामना, सेंच्युरियन
३ ते ७ जानेवारी, २०२४ : दुसरा कसोटी सामना, केपटाऊन.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button