breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Shikhar Dhawan | लभारतीय संघाचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. धवनने २४ ऑगस्ट रोजी सकाळी एक्सवर एक व्हिडीओ शेअर करुन याबाबत माहिती दिली. व्हिडिओ पोस्ट करताना शिखर धवनने कॅप्शनमध्ये लिहिले की, मी आता माझ्या क्रिकेट प्रवासाचा हा अध्याय संपवत आहे. मी माझ्या सोबत असंख्य आठवणी घेऊन जात आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी आणि समर्थनासाठी धन्यवाद! जय हिंद!

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शिखर धवन म्हणाला की, आज मी अशा वळणावर उभा आहे की जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला फक्त आठवणी दिसतात आणि जेव्हा मी पुढे पाहतो तेव्हा मला संपूर्ण जग दिसते. भारतासाठी खेळण्याचे माझे नेहमीच एक ध्येय होते आणि ते पूर्ण झाले ज्यासाठी मी अनेक लोकांचा आभारी आहे.

हेही वाचा     –      मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे त्रुटी असलेले अर्ज फेरसादर करण्याचे आवाहन

सर्वप्रथम माझे कुटुंब, माझे बालपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा जी आणि मदन शर्मा जी यांच्या मार्गदर्शनाखाली मी क्रिकेट शिकलो. मग माझी टीम ज्यांच्यासोबत मी वर्षानुवर्षे खेळलो जिथे मला माझे कुटुंब मिळाले आणि तुम्हा लोकांचे समर्थन आणि प्रेम मिळाले. कथेत पुढे जाण्यासाठी पानं उलटावी लागतात असं म्हणतात, म्हणून मीही तेच करणार आहे. मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतो. जेव्हा मी माझ्या क्रिकेट प्रवासाला निरोप देत आहे, तेव्हा मी माझ्या देशासाठी खूप खेळलो याचा मला दिलासा वाटतो. मला ही संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआय आणि डीडीसीएचे आभार मानू इच्छितो आणि माझ्यावर खूप प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानू इच्छितो, असं शिखर धवन म्हणाला.

शिखर धवनची क्रिकेट कारकीर्द :

शिखर धवनने 2010 मध्ये भारतीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याला ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदिवसीय मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. त्याला भारतीय संघासाठी 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामने खेळण्याची संधी मिळाली. धवनने कसोटी क्रिकेटमध्ये ४०.६१ च्या सरासरीने २३१५ धावा केल्या, तर त्याने ७ शतके आणि ५ अर्धशतकेही झळकावली. वनडेमध्ये ४४.११ च्या सरासरीने ६७९३ धावा केल्या ज्यात १७ शतके आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ११ अर्धशतकांसह २७.९२ च्या सरासरीने १७५९ धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने शिखर धवन आता आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button