breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेत भारताने मिळवली ५ सुवर्ण पदके

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारतीय संघासाठी रविवारचा दिवस चांगला होता. भारताला एकूण ५ पदके मिळाली आहेत. आशियाई खेळांमध्ये भारतातून एकूण ६५५ खेळाडू सहभागी झाले आहेत, जे आतापर्यंत देशातील सर्वात मोठे संघ आहे. एकूण 40 स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू आव्हान देतील.

१९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला नेमबाजीत पहिले पदक मिळाले. मेहुली घोष, आशी चौकसे आणि रमिता यांनी महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारतासाठी हे पदक जिंकले. त्यानंतर रोइंगमध्येही भारताने रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. भारतीय महिला क्रिकेट संघानेही अंतिम फेरी गाठली आहे. नंतर रमिताने महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले.

हेही वाचा – ‘शहराच्या वैभवात भर पडेल असे काम करा’; उपमुख्यमंत्री अजित पवार

आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये नेमबाजीनं भारताची मेडल टॅलीचं खातं उघडलं. भारताच्या रमिता, मेहुली आणि आशी यांनी मिळून महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकलं. तिघांनी मिळून १८८६ गुण मिळवले. यामध्ये रमितानं ६३१.९ गुण, मेहुलीनं ६३०.८ तर आशीनं ६२३.३ गुण मिळवले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button