breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

विराट विक्रम रचण्यास सज्ज! आज वानखेडे स्टेडियमवर रंगणार भारत विरुद्ध श्रीलंका सामना

INDvsSL : वर्ल्डकपच्या महासंग्रामातील ३३ वा सामना भारत विरुद्ध श्रीलंका आज २ नोव्हेंबर २०२३ ला पार पडणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आत्तापर्यंत सहा सामन्यांमध्ये विजय मिळवून भारतीय संघाचे दमदार कामगिरी केली आहे.

आजच्या सामन्यात विराट कोहलीच्या खेळीवर सर्वांचं लक्ष लागणार आहे. कारण कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत ४८ शतके झळकावली आहेत. त्यामुळे कोहलीला सचिन तेंडुलकरच्या या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.

भारतीय संभाव्य संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सुर्यकुमार यादव, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

हेही वाचा – ‘प्रधानमंत्री आवास’च्या लाभार्थींना ‘विंटर गिफ्ट’ 

किती वाजता सुरू होणार सामना?

दुपारी २ वाजता; अर्धा तास आधी नाणेफेक होईल.

लाईव्ह प्रक्षेपण कुठं पाहता येईल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेल

सामना मोबाईलवर कुठं पाहता येईल?

Disney+Hotstar

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button