breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा; ‘या’ युवा खेळाडूला संधी

IND vs ENG | इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आलं आहे. युवा खेळाडू ध्रुव जुरेलला संघात संधी मिळाली आहे. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला बाहेर ठेवण्यात आलं आहे.

भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज अफगाणिस्तानविरूद्धच्या टी-२० मालिकेत सहभागी नाहीत. दोघांनाही ब्रेक देण्यात आला आहे. मात्र, इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यांत दोघांचे पुनरागमन झाले आहे. आवेश खान, मुकेश कुमार, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, आर आश्विन आणि कुलदीप यादव यांचाही संघात समावेश आहे.

हेही वाचा   –  भाई तुरूंगात, वाढदिवस मात्र पुण्याच्या रस्त्यावर; पोलिसांनी काढली धिंड

कोण आहे ध्रुव जुरेल?

ध्रुव जुरेल हा उत्तर प्रदेशकडून खेळतो. २२ वर्षीय ध्रुव शेष भारत आणि अंडर १९ इंडिया अ संघाकडूनही खेळला आहे. त्याची देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील चांगली राहिली आहे. ध्रुवने १५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये ७९० धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. यासोबतच त्याने १० लिस्ट ए सामनेही खेळले आहेत. ध्रुव जुरेलने इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना शानदार कामगिरी केली आहे.

इंग्लंडविरूद्धच्या सामन्यांसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, केएस भरत, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवेंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक :

  • पहिला टेस्ट : २५-२९ जानेवारी, हैदराबाद
  • दुसरा टेस्ट : २-६ फेब्रुवारी, विशाखापट्टणम
  • तिसरा टेस्ट : १५-१९ फेब्रुवारी, राजकोट
  • चौथा टेस्ट : २३-२७ फेब्रुवारी, रांची
  • पाचवा टेस्ट : ७-११ मार्च, धर्मशाला.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button