‘जागतिक क्रिकेटमध्ये भारत लाडका कारण…’ मोहम्मद हाफीज स्पष्टच बोलला
!['India is beloved in world cricket because...' Mohammad Hafeez spoke clearly](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/Feature-2022-09-03T101147.621.jpg)
पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हफीझ मागील काही दिवसात भारतीय संघांवर केलेल्या टिप्पण्यांमुळे चर्चेत आहे. सुरुवातीला भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला घाबरलेला व कमकुवत म्हणत तो फार काळ कर्णधारपदी टिकणार नाही असे हाफीजने म्हंटले होते. त्यापाठोपाठ आता भारत कसा जागतिक क्रिकेटमधील ‘लाडका’ संघ आहे यावर हाफीजने आपले मत मांडले आहे. हाफिझने यासंबधी पाकिस्तानच्या पीटीव्ही वाहिनीवरील चर्चासत्रात भाष्य केले आहे. भारत चांगला खेळतोच पण जागतिक क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे लाड होण्यामागे हे कारण नाही असेही हाफीज म्हणाला आहे.
हाफीजने स्वतः यासंबधी शेअर केलेल्या ट्विटमध्ये आपण पाहू शकता की पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू म्हणतो, मला हे निश्चितपणे माहित आहे की आपल्याकडे जो कोणी कमावतो तो सगळ्यांना आवडणारा, सगळ्यात लाडका ठरतो.”
हाफीजच्या या कमेंटनंतर पॅनेलवर एकच हशा पिकला होता पुढे हाफीज म्हणाला की, “भारत हा कमाई करणारा देश आहे. त्यामुळे जगभरातील द्विपक्षीय मालिकांमध्येही, जिथे त्यांना प्रायोजकत्व मिळते, त्यांना जॅकपॉट मिळतो, या गोष्टी नाकारणे कठीण आहे”. जेव्हा शोमधील सादरकर्त्याने विचारले की भारत उत्तम खेळामुळे ‘लाडका’ आहे की पैसे कमावतो म्हणून लाड होतात तेव्हा हाफीजने भारताची कमाई हेच त्यांचे लाड होण्यामागे मुख्य कारण आहे असे म्हंटले आहे.