breaking-newsक्रिडा

IND vs WI : संघासाठी एका ओव्हरमध्ये सहा वेळा डाईव्ह मारायलाही तयार : विराट

IND vs WI : भारताचा कर्णधार विराट कोहली याने बुधवारी विंडीजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दहा हजार धावा पूर्ण केल्या. या बरोबरच तो सर्वात जलद १० हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा फलंदाज ठरला. त्याने २०५ डावांमध्ये ही कामगिरी केली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडला. या पराक्रमानंतर BCCIला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत विराटने आपल्यावर होणाऱ्या टीकांना आपल्या ‘स्टाईल’मध्ये उत्तर दिले. त्याच वेळी संघासाठी एका ओव्हरमध्ये सहा वेळा डाइव्ह मारायलाही तयार असल्याचेही सूचक वक्तव्य त्याने केले.

विराट कोहली १४८ धावांवर खेळत होता. त्यावेळी त्याने दोन धावा काढत आपले दीडशतक पूर्ण केले. महत्वाचे १५०वी धावा घेताना त्याने क्रीजमध्ये पोहोचण्यासाठी डाईव्ह मारली. कोहली अंदाजे २०० मिनिटे मैदानावर होता. पण तरीदेखील त्याने त्या परिस्थितीमध्ये डाईव्ह मारून धाव पूर्ण केली. याबाबत उत्तर देताना कोहली म्हणाला की असे माझ्यावर अनेकदा टीका करण्यात येते. पण मी माझ्या संघासाठी एका षटकामध्ये सहा वेळादेखील डाईव्ह मारू शकतो, असे तो म्हणाला.

कोहलीने दुसऱ्या सामन्यात घेतलेली एक ‘शॉर्ट’ धाव सामना अनिर्णित राखण्यासाठी कारणीभूत ठरली, अशी टीका त्याच्यावर झाली होती. त्यामुळे कोहलीच्या त्या उत्तराचा रोख या टीकेकडे होता, असे म्हटले जात आहे.

Vipin Kirad@VipinKirad

विराट का शॉर्ट रन.

भारताचे सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर विराट आणि रायडू यांनी डाव सावरला आणि झटपट धावा जमवण्यास सुरुवात केली. पण ११व्या षटकात विराट कोहली आणि अंबाती रायुडु खेळपट्टीवर असताना विराटकडून एक चूक घडली. अॅशले नर्सच्या षटकाच्या एका चेंडूवर विराटने डीप मिडविकेटच्या दिशेने फटका मारला. त्याला दोन धावा घेण्याची संधी मिळाली. मात्र, दुसरी धाव घेताना विराट घाईघाईत पहिली धाव पूर्ण न करताच मागे फिरला. ती धाव ‘शॉर्ट’ देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button