breaking-newsक्रिडा
IND vs SA : “…म्हणून विराटच्या आसपास जगातील इतर कोणताही कर्णधार नाही”
![Virat Kohli leaves Test captaincy](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/Virat-captain.jpg)
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पुण्याच्या गहुंजे मैदानावर ऐतिहासिक कामगिरीची नोंदवली. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि १३७ धावांनी मात करत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. फॉलोऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांची भंबेरी उडवली.
![](https://loksattawpcontent.s3.amazonaws.com/uploads/2019/10/team-india-with-virat.jpg)
या विजयासह घरच्या मैदानावरचा भारतीय संघाचा हा विक्रमी सलग ११ वा कसोटी मालिका विजय ठरला. याशिवाय कर्णधार म्हणून हा विराटचा १३ वा कसोटी मालिका विजय ठरला. विराट हा कसोटीत कर्णधार म्हणून सर्वाधिक मालिका विजय मिळवणारा भारतीय ठरला. त्याच्या नेतृत्वकौशल्याचे माजी पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तर यानेही कौतुक केले आहे.