breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

Euro 2020 : बेल्जियमचा विजय; पोर्तुगाल स्पर्धेबाहेर

ब्रुसेल्स – युरो कप २०२०मध्ये काल झालेल्या करो या मरोच्या बाद फेरीतील सामन्यात बेल्जियमने पोर्तुगालवर १-० ने विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली. सामन्याच्या ४२व्या मिनिटाला बेल्जियमच्या थोरगन हाझार्डने नोंदवलेला गोल हा सामन्यातील एकमेव गोल ठरला. थोरगन हाझार्डकडे आलेल्या पासचा त्याने योग्य उपयोग करत चेंडू गोलपोस्टच्या दिशेने धाडला आणि फर्स्ट हाफ संपण्यासाठी तीन मिनिटे बाकी असतानाच आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली, जी शेवटपर्यंत कायम राहिली. आता शुक्रवारी बेल्जियमचा सामना इटलीशी होणार आहे.

दरम्यान, राऊण्ड ऑफ १६ म्हणजेच बाद फेरीत तिन्ही सामने बेल्जियमने जिंकले असून ते ब गटात अव्वल स्थानी आहेत. ग्रुप स्टेजेसच्या तीन सामन्यांत त्यांनी सात गोल केलेत. तर दुसरीकडे माजी विजेत्या पोर्तुगालच्या संघाला ग्रुप स्टेजेसमधील तीनपैकी एकच सामना जिंकता आला.

कालच्या सामन्यातील आकडेवारी पाहिल्यास बेल्जियमने सहा शॉर्ट्स मारले तर पोर्तुगालने त्यांच्या चौपट म्हणजेच २३ शॉर्ट्स मारत गोलचा प्रयत्न केला. शॉर्ट्स ऑन टार्गेटमध्ये बेल्जियमचा एकच शॉर्ट होता जो ४२ मिनिटांचा गोल ठरला. तर दुसरीकडे पोर्तुगालने केलेले चार प्रयत्न अगदी गोलपोस्ट जवळ गेले मात्र त्यांना एकही गोल करता आला नाही. एकूण वेळेपैकी ५८ टक्के वेळा चेंडू पोर्तुगालच्या ताब्यात होता तर बेल्जियमकडे चेंडू ४२ टक्के वेळ होता. बेल्जियमने एकूण ४५१ पास केले तर पोर्तुगालने ५९७ पास केले. तसेच बेल्जियमच्या संघाला दोन यल्लो कार्ड मिळाले, तर पोर्तुगालच्या संघातील तीन खेळाडूंना यल्लो कार्ड मिळाले. बेल्जियम या संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे हे विशेष.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button