Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारतीय बॅडमिंटनमधील सुवर्णअध्याय संपला; सायना नेहवालची निवृत्तीची घोषणा

Saina Nehwal | ऑलिम्पिक पदक विजेती आणि भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने स्पर्धात्मक खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना सायनाने आपल्या शरीराची सध्याची स्थिती उच्च स्तरावर खेळण्यासाठी अनुकूल नसल्याचं स्पष्ट केलं.

२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकदरम्यान झालेल्या गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे सायनाच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला होता. मात्र, त्यानंतर तिने २०१७ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक आणि २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत दमदार पुनरागमन केलं. तरीही गुडघ्याच्या सततच्या समस्यांमुळे तिची प्रगती मर्यादित राहिली. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी सायना २०२३ च्या सिंगापूर ओपनमध्ये शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळली होती.

हेही वाचा     :          महाराष्ट्र भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मी दोन वर्षांपूर्वी स्पर्धात्मक सामने खेळणं थांबवलं होतं. मला वाटलं की मी माझ्या स्वतःच्या अटींवर खेळायला सुरुवात केली आहे आणि माझ्या स्वतःच्या अटींवर निवृत्त होईन, म्हणून ते जाहीर करण्याची गरज नव्हती. जर तुम्ही आता खेळू शकत नसाल तर ते ठीक आहे, सायनाने एका पॉडकास्टमध्ये म्हटलं.

माझं कार्टिलेज पूर्णपणे झिजलं आहे, मला संधिवात (आर्थरायटिस) झाला आहे. हे माझ्या पालकांना आणि प्रशिक्षकांना माहिती असणं गरजेचं होतं आणि मी त्यांना ते सांगितलं. आता कदाचित मी पुन्हा खेळू शकणार नाही, असंही सायनाने स्पष्ट केलं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button