breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

#CSK vs SRH : चेन्नईची विजयी घोडदौड; हैदराबादवर 7 विकेट्सने शानदार विजय

नवी दिल्ली – आयपीएलच्या मैदानावर काल चेन्नई सुपर किंग्सने सनरायजर्स हैदराबादवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. हैदराबादने चेन्नईला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान चेन्नईने 3 विकेट्स गमावून पूर्ण केले. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 75 धावांची खेळी केली. तसेच फॅफ डु प्लेसिसने 56 धावा केल्या. तर हैदराबादकडून राशिद खानने सर्वाधिक 3 विकेट्स घेतले. या सामन्याचे आयोजन दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आले होते. दरम्यान, हैदराबादचा या आयपीएलमधील हा पाचवा पराभव आहे. या पराभवासह हैदराबाद आठव्या स्थानावरच आहे. तर आयपीएलमध्ये पहिला सामना गमावल्यानंतर चेन्नईचा हा सलग पाचवा विजय आहे. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे.

कालच्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांना हैदराबादचे ३ गडी बाद करण्यात यश आले. मात्र गोलंदाजांनी धावसंख्या रोखण्यात मोलाचे योगदान दिले. डेविड वॉर्नर आणि मनिष पांडे मोठे फटके मारण्यासाठी झगडत राहिले. त्यामुळे हैदराबादला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. डेविड वॉर्नरने ५५ चेंडूत ५७ धावा केल्या. त्यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे, तर मनिष पांडेने ४६ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. यात ५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागिदारी केली. मात्र धावसंख्या धीम्या गतीने पुढे सरकत होती. त्यामुळे हैदराबादला १७१ या धावसंख्येवरच मजल मारता आली. हैदराबादकडून राशीद खानने चांगली गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात ३६ धावा देत ३ गडी बाद केले. मात्र दुसरा एकही गोलंदाज चेन्नईचा गडी बाद करू शकला नाही.

त्यानंतर विजयी धावांचा पाठलाग करताना चेन्नईची धमाकेदार सुरुवात झाली. चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिस या सलामी जोडीने चेन्नईला दमदार सुरुवात मिळवून दिली. यो दोघांनी 129 धावांची भागीदारी केली. या दोघांनी अर्धशतके झळकावली. फाफने ३८ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. त्यात ६ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. तर ऋतुराजने ४४ चेंडूत ७५ धावांची खेळी केली. यात १२ चौकारांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button