Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय
#COVID19: रामदेवबाबांच्या पतंजलीकडून २५ कोटी रुपयांची मदत; बीसीसीआयकडून ५१ कोटी!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/16-1.jpg)
नवी दिल्ली। महाईन्यूज । टीम ऑनलाईन
कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाला मदत करण्यासाठी योगगुरू रामदेव बाबा यांच्या पंतजली संस्थेनेही पुढाकार घेतला आहे. संस्थेकडून ‘पीएमसीएआरईएस’फंडाकरीता २५ कोटी रुपये मदत करण्याची घोषणा रामदेव बाबा यांनी केली आहे.
दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ५१कोटी रुपये मदतनिधी दिला आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/EUWdjV1UYAAmv95.jpg)