Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

‘आझाद काश्मीर..’; पाकिस्तानच्या माजी महिला कर्णधाराचं वादग्रस्त विधान

ICC Women’s World Cup 2025 | आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेला सुरूवात झाली असून स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात रंगलेली लढत वादग्रस्त ठरली आहे. या सामन्यात समालोचन करताना पाकिस्तानची माजी कर्णधार सना मीरने केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये महिला वर्ल्डकप स्पर्धेतील सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानला बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी सुरू होती. त्यावेळी २९ व्या षटकात पाकिस्तानची फलंदाज नतालिया परवेज फलंदाजीला आली. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी येतो, त्यावेळी समालोचक खेळाडूंची ओळख करून देतात. पण नतालिया परवेजची ओळख सांगताना, सना मीरने ही काश्मीरची रहिवाशी आहे, असं सांगितलं. पण हे म्हणाल्यानंतर तिने लगेचच ती स्वतंत्र काश्मीरची रहिवाशी असल्याचं सांगितलं. हे वक्तव्य थेट समालोचनादरम्यान झाल्यामुळे त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिच्यावर जोरदार टीका होत आहे.

हेही वाचा       :        कच्च्या तेलाचे दर घसरले; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

काश्मीर हा पाकिस्तानचा भाग असल्याचा दावा पाकिस्तानकडून वारंवार केला जातो. मात्र क्रीडा मंचावर ‘आझाद काश्मीर’चा उल्लेख करून राजकीय अजेंडा पुढे रेटल्याचा आरोप सना मीरवर होत आहे. यावरून सोशल मीडियावरही वाद पेटला आहे आणि तिला ट्रोलिंगला सामोरे जावं लागत आहे.

दरम्यान, पुढील सामना ५ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार असल्याने या वक्तव्यानंतरचा वाद अजूनच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button