breaking-newsक्रिडा

BWF World Tour Finals 2018 : पीव्ही सिंधूने रचला इतिहास

गुआंगझोउ – भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्सच्या अंतिम फेरीत विश्व विजेत्या नोझुकू ओकुहाराचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. पीव्ही सिंधूने 21-19 , 21-17 अशा सरळ सेटमध्ये ओकुहाराचा पराभव करत या स्पर्धेचे पहिलेवहिले सुवर्णपदक पटकावले. अशी कामगिरी करणारी पीव्ही सिंधू ही पहिलीच भारतीय महिला बॅटमिंटनपटू आहे. पीव्ही सिंधूचा हे 14वे विजेतेपद आहे तर कारकिर्दीतील 300 वा विजय आहे.

View image on Twitter

Khelo India

@kheloindia

Sindhu creates history!
An outstanding performance by @Pvsindhu1 as she wins 2018 in China comprising yr’s best 8 players w/ 21-19,21-17 win over Nozomi Okuhara.
Becoming 1st Indian to win this tourney,many youngsters are sure to be inspired by this.🏸

54 people are talking about this
-Ads-

पहिल्या सत्रात पूर्णपणे सिंधूचे वर्चस्व होते. मध्यंतरापर्यंत सिंधूने 11-6 ने आघाडी घेतली. मात्र त्यानंतर ओकुहाराने चांगला खेळ करत 16-16 अशी बरोबरी साधली. मात्र सिंधूने जबरदस्त खेळ करत 21-19 अशा गुणांनी पहिले सत्र नावावर केले.

दुसऱ्या सत्रात देखील सिंधूने चांगला खेळ करत मध्यंतरापर्यंत 11-9 अशी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर देखील सिंधूने चांगला खेळ करत 21-17 अशा गुणांनी दुसरे सत्र देखील आपल्या नावावर करत विजय मिळवला.

मागील सलग सात स्पर्धेत सिंधूला पराभवाला सामोरे जावे लागले होते. आज मात्र अखेर तिने वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button