breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

बंगळुरुची प्लेऑफमध्ये ‘रॉयल’ एन्ट्री, आरसीबी भल्याभल्यांना पुरून उरली

IPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 68 व्या सामन्यात इतिहास रचला आहे. आरसीबीने चेन्नई सुपर किंग्सवर मात करत 22 मार्चच्या पराभवाचा वचपा घेतला. आरसीबीचा हा सलग सहावा विजय ठरला. आरसीबीने या विजयासह 14 गुणांसह प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. आरसीबीने चेन्नईसमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी हा सामना 18 धावांच्या फरकाने जिंकायचा होता. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांसमोर चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 191 धावांपर्यंतच पोहचता आलं.आरसीबी या विजयासह प्लेऑफसाठी पात्र ठरली. तर चेन्नईचं पॅकअप झालं आहे. तसेच आरसीबीच्या या विजयासह प्लेऑफमध्ये पोहचणारे चारही संघ निश्चित झाले आहेत. आता पहिल्या 2 स्थांनासाठी चुरस असणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन आणि मोहम्मद सिराज.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दूल ठाकुर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग आणि महेश तीक्षना.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button