भारतीय संघाच्या मुख्य निवडकर्ते पदी अजित अगरकर, BCCI ची घोषणा
![BCCI announces Ajit Agarkar as chief selector of Indian team](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Ajit-Agarkar-780x470.jpg)
Ajit Agarkar : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते पदी भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू अजित अगरकर यांची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयला आशिया चषक आणि विश्वचषकापूर्वी आपला निवडकर्ता मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे पद रिक्त होतं. अखेर BCCI ने यावर शिक्कामोर्तब केला आहे.
संघाच्या मुख्य निवडकर्ते पदावरून चेतन शर्मा यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे ही जागा खाली झाली होती. अशोक मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीद्वारे ही निवड करण्यात आली आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवड समितीत शिवस सुंदर दास, सुब्रोत बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरत यांचा समावेश असेल.
हेही वाचा – ‘अजित पवारांचा निर्णय हा राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी’; आमदार श्रीकांत भारतीय
https://twitter.com/BCCI/status/1676259516764258305?
४५ वर्षीय आगरकरकडे २६ कसोटी, १९१ एकदिवसीय आणि ४ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. अजित आगरकरच्या नावावर २६ कसोटी सामन्यात ५९ बळी आहेत. तर १९१ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने २८८ बळी घेतले आहेत. याशिवाय ४ टी२० सामन्यात त्याने ३ बळी घेतले आहेत. यासह अजित आगरकरने आयपीएलच्या ४२ सामन्यांमध्ये २९ फलंदाजांना बाद केलं. दुसरीकडे, अजित आगरकरच्या कसोटी फॉरमॅटमध्ये फलंदाजीबद्दल बोलायचे तर या खेळाडूने १६.७९ च्या सरासरीने ५७१ धावा केल्या आहेत. तर १९१ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने १४.५९ च्या सरासरीने १,२६९ धावा जमवल्या.