breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

BCCI च्या मेडिकल टीममधील वरिष्ठ मेंबर कोरोना पॉझिटिव्ह

चेन्नई सुपर किंग्स टीमनंतर कोरोना व्हायरसचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) देखील फटका बसला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय टीममधील एका सदस्याला कोविड-19 (COVID-19) ची सकारात्मक लागण झाल्याचं समोर आलं आहे.

बीसीसीआयचा एका सदस्य कोरोना व्हायरस पोसिटवे असल्याची बातमी एका वृत्तसंस्थेने दिली. युएईमधील बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या एका सदस्याने कोविड पॉझिटिव्हची चाचणी केली आहे अशी बोर्डमधील सूत्रांनी पुष्टी केली. सीएसके टीममधील 13 जणं कोविड पॉसिटीव्ह आढळलल्यानंतर आणखीन एक प्रकरण समोर आलं आहे. शिवाय, बंगळुरु येथील नॅशनल क्रिकेट अकादमीतील (NCA) दोन जणांची कोरोना चाचणी सकारत्मक असल्याचं उघड झालं आहे.

न्यूज एजन्सीला बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले, त्याचे दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आहे. बोर्डाच्या वैद्यकीय टीमच्या सदस्याला कोरोनाची लागण झाल्याने मंडळाच्या अडचणींमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे.

बीसीसीआयशी संबंधित एका सूत्रांनी म्हटले, “हे खरे आहे (बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाचे सदस्य कोरोना पॉझिटिव्ह), परंतु तो (वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी) एसिम्प्टोमॅटिक आहे आणि त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. युएई दौर्‍यादरम्यान तो कोणाशीही संपर्क साधलेला नाही. त्याच्यावर लक्ष ठेवले जात आहे आणि पुढील टेस्टच्या फेरीमध्ये ते नक्कीच ठीक येतील. एनसीएमध्ये देखील दोन लोकं आहेत, ज्यांचा अहवालही सकारात्मक आला आहे. त्यांना आयसोलेट केले आहेत.”

आयपीएल 19 सप्टेंबरपासून दुबई, शारजाह आणि युएई म्हणजेच युएईच्या अबूधाबी येथे खेळले जाणार आहे. यापूर्वीआयपीएलमध्ये 13 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. पुढील कोविड-19 टेस्टमध्ये या 13 जणांना वगळता, सीएसकेचे सर्व सदस्य नेगेटिव्ह आढळले असले तरी भारतीय बोर्डासाठी अद्याप हा चिंतेचा विषय बनला आहे. सीएसके टीम वगळता अन्य सर्व संघांनी आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण करून सरावाला सुरुवात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button