अवनी लखेराने मिळविले पुन्हा दुसरे पदक!!!
![Avni Lakhera wins second medal again !!!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/avani-lakhera.jpg)
नवी दिल्ली – टोकिओमध्ये सुरू असलेल्या २०२० पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा आजचा शुक्रवार हा दिवस आनंदाचा राहिला आहे. कारण, भारताला १२ वे पदक मिळाले आहे. अवनी लखेरा हिने नेत्रदीपक कामगिरी करत ५० मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे.
अनवी लखेराचं हे २०२० पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील दुसरं पदक आहे. याचबरोबर भारताकडे एकूण १२ पदक आलेली आहेत. अवनी लखेरा हिने ५० मीटर एअर रायफलच्या 3P SH 1 या इव्हेंटमध्ये कांस्य मिळविलेले आहे. अवनीचे वयाच्या १९ व्या वर्षी ४४४.९ असा स्कोर करून तिसरं स्थान पटवकावलं आहे.
दोन वेळा रचला इतिहास…
टोकिओ पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये अवनीने सलग दोन वेळा पदक मिळवून इतिहास घडवला आहे. अवनी लखेरा ही पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये सूवर्ण पदक मिळवून देणारी पहिली महिला खेळाडू ठरलेली आहे. आता पुन्हा पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये एकपेक्षा जास्त पदक मिळाणारी पहिली महिला खेळाडू ठरण्याचा मानदेखील तिलाच जातो. पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुरुवातीला १० मीटर एअर रायफलच्या क्लास SH1 इव्हेंटमध्ये सूवर्ण पदक मिळवलं आहे.