Asian Games 2023 : बांगलादेशचा पराभव करत भारतीय संघाचा फायनलमध्ये प्रवेश
![Asian Games 2023 Indian team enters the final after defeating Bangladesh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Asian-Games-2023--780x470.jpg)
Asian Games 2023 : चीनमधील हांगझोऊमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट भारतीय संघाची विजयी घौडदौड सुरुच आहे. एशियन गेम्समध्ये सेमीफायनलच्या सामन्यात भारत विरूद्ध बांगलादेश यांच्या सामना रंगला होता. यावेळी भारतीय संघाने ९ विकेट्सने बांगलादेशाचा दारूण पराभव केला आहे. या विजयासोबत टीम इंडियाने फायनलचं तिकीट मिळवलं आहे.
सेमीफायनलच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी दाखवत बांगलादेशच्या फलंदाजांना केवळ ९६ रन्सपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघाकडून साई किशोरने सर्वाधिक म्हणजेच ३ विकेट घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदरने २ विकेट्स घेतले.
हेही वाचा – जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटमुळे अण्णा हजारे भडकले; म्हणाले..
Just ☝️ step away from the 🥇 now 😎💙
If this was a boxing match, this result would have been like #TeamIndia KO-ing 🇧🇩 with 1 punch 👊#Cheer4India #Cricket #AsianGames2023 #HangzhouAsianGames #SonyLIV pic.twitter.com/MPJfIvVUzA
— Sony LIV (@SonyLIV) October 6, 2023
सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजांनी बांगालदेशी खेळाडूंची चांगलीच दाणादाण उडवली.