breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

मोहम्मद शमीसह २६ जणांना अर्जुन पुरस्कार, तर २ खेळाडूंना खेलरत्न

नवी दिल्ली : या वर्षी देण्यात येणाऱ्या क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यातील सर्वात मोठा सन्मान म्हणजे बॅडमिंटन स्टार जोडी चिराग तिला दिलेला खेलरत्न पुरस्कार… तर स्टार क्रिकेटर मोहम्मद शमीचाही अर्जुन पुरस्कारासाठी समावेश करण्यात आला आहे.

हे सर्व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार ९ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित एका मोठ्या कार्यक्रमात दिले जातील. क्रीडा मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. हे सर्व पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूंना प्रदान करण्यात येणार आहेत.

क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी मोहम्मद शमीसह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. तर चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार २०२३ ने सन्मानित केले जाईल. हे सर्व पुरस्कार या खेळाडूंना त्यांच्या खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात येणार आहेत.

क्रीडा मंत्रालयाने माहिती दिली आहे की समित्यांच्या शिफारसींच्या आधारावर आणि योग्य तपासानंतर सरकारने या सर्व खेळाडूंची, प्रशिक्षकांची आणि संस्थांची पुरस्कारांसाठी निवड केली आहे. मंत्रालयाने सर्व पुरस्कार प्राप्त खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची यादीही प्रसिद्ध केली आहे.

हेही वाचा – ‘स्वारगेट-कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार’; मंत्री उदय सामंत यांची माहिती

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार २०२३

चिराग शेट्टी – बॅडमिंटन
सात्विकसाईराज रँकिरेड्डी – बॅडमिंटन

अर्जुन पुरस्कार २०२३

ओजस प्रवीण देवतळे – धनुर्विद्या
अदिती गोपीचंद स्वामी – धनुर्विद्या
श्रीशंकर – ऍथलेटिक्स
पारुल चौधरी – ऍथलेटिक्स
मोहम्मद हुसामुद्दीन- बॉक्सर
आर वैशाली – बुद्धिबळ
मोहम्मद शमी – क्रिकेट
अनुष अग्रवाल – घोडेस्वारी
दिव्यकृती सिंह – घोडेस्वारी
दीक्षा डागर – गोल्फ
कृष्ण बहादूर पाठक – हॉकी
सुशीला चानू – हॉकी
पवन कुमार – कबड्डी
रितू नेगी – कबड्डी
नसरीन – खो-खो
पिंकी – लॉन बॉल्स
ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर – शूटिंग
ईशा सिंह – शूटिंग
हरिंदर पाल सिंग- स्क्वॉश
अहिका मुखर्जी – टेबल टेनिस
सुनील कुमार – कुस्ती
अंतिम – कुस्ती
रोशिबिना देवी – वुशू
शीतल देवी – पॅरा धनुर्विद्या
अजय कुमार – अंध क्रिकेट
प्राची यादव – पॅरा कॅनोई

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button