नीरज चोप्रानंतर आता त्याने फेकलेला भालाही करणार विक्रम?; लागली ‘इतक्या’ कोटींची बोली
![After Neeraj Chopra, he will now make a record of throwing a spear ?; There was a bid of 'so many' crores](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/neeraj-chopra.jpg)
नवी दिल्ली |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटवस्तूंचा ई-लिलाव आज संध्याकाळी संपणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. सुरू असलेल्या लिलावात, ऐतिहासिक वस्तू आणि धार्मिक कलाकृतींमध्ये लोकांनी अधिक रस घेतला आहे असे दिसते, तर ऑलिम्पिक खेळाडूंच्या क्रीडा साहित्याला सर्वाधिक बोली मिळाली आहे. ऑनलाईन लिलाव १७ सप्टेंबर रोजी सुरू झाला होता आणि आज संध्याकाळी ५ वाजता संपेल.नीरज चोप्राने वापरलेल्या भाला, ज्याने त्याला सुवर्णपदक मिळवून दिले, त्याला सर्वाधिक बोली मिळाली, असे पीएम मेमेंटोस वेबसाइटने म्हटले आहे. त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये होती आणि सध्या ती एक कोटी ५० हजारांवर पोहोचली आहे, असे वेबसाइटने म्हटले आहे. या भाल्यावर आतापर्यंत दोन बोली लावण्यात आल्या आहे.
नीरज चोप्रा याने आपली सही असलेला भाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून दिला होता. या भाल्याला पहिल्या दिवशी सर्वाधिक 10 कोटी रुपयांची बोली मिळाली, पण नंतर ती बनावट बोली असू शकते या संशयावरून रद्द करण्यात आली. पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सुमित अँटिलने वापरलेला आणखी एक भाला, ज्याची मूळ किंमत एक कोटी आहे, त्याला एका बोलीदाराकडून एक लाख २० हजारांची बोली मिळाली आहे, तर अयोध्येतील राम मंदिराच्या लाकडी मॉडेलवर 24 बोली लागल्या आहेत. मंदिराचे मूळ मूल्य दोन लाख ५० हजार होते. धातूची गदा, ज्याची मूळ किंमत दोन हजार ५०० होती, त्याला ५४ बोली मिळाल्या, ज्यामध्ये सर्वाधिक बोली पाच लाखांची आहे.
टोकियो २०२० पॅरालिम्पिक गेम्सचे सुवर्णपदक विजेते कृष्णा नगर यांनी ऑटोग्राफ केलेल्या बॅडमिंटन रॅकेटला सर्वाधिक ८० लाख १५ हजारांची बोली लागली पण त्यात फक्त तीनच बोलीदारांनी स्वारस्य दाखवले. त्याचप्रमाणे, भगवान राम परिवार नावाची भगवान राम, हनुमान, लक्ष्मण आणि देवी सीता यांच्या प्रतिमा असलेल्या एका लहान धातूच्या मूर्तीला ४४ बोली प्राप्त झाल्या आहेत, ज्यामध्ये सर्वाधिक बोली एक लाख ३५ हजारांची लागली आहे. त्याची मूळ किंमत फक्त दहा हजार होती. धार्मिक वस्तूंव्यतिरिक्त, एका काचेच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या रणगाड्याच्या त्रिमितीय प्रतिकृती मॉडेलला २३ बोली प्राप्त झाल्या आहेत, ज्यामध्ये सर्वाधिक बोली पाच लाखांची आहे. त्याची मूळ किंमत ७५ हजार होती. आतापर्यंत १,३४८ स्मृती चिन्हांपैकी सुमारे १,०८३ वस्तूंना बोली प्राप्त झाली आहे.