breaking-newsक्रिडा

स्मिथ-वॉर्नर यांच्या पुनरागमनाकडे लक्ष!

  • ऑस्ट्रेलिया-श्रीलंका क्रिकेट मालिका

स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे ऑस्ट्रेलियाचे दोन प्रमुख आधारस्तंभ चेंडू फेरफारीची शिक्षा भोगून तब्बल दीड वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळेच रविवारी अ‍ॅडलेड येथे रंगणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात या खेळाडूंच्या कामगिरीवर क्रिकेटप्रेमींचे खास लक्ष असणार आहे.

कर्णधार आरोन फिंचही या मालिकेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त झाला असला तरी वेगवान गोलंदाज अँड्रय़ू टायला मात्र उजव्या कोपराच्या दुखापतीमुळे या मालिकेला मुकावे लागणार आहे. टायच्याऐवजी सीन अबॉटला संधी देण्यात आली आहे.

दुसरीकडे तीन सामन्यांच्या या मालिकेसाठी अनुभवी लसिथ मलिंगा श्रीलंकन संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार असून कुशल परेरा, निरोशन डिकवेल्ला यांच्यावर त्यांची प्रामुख्याने भिस्त असेल.

सामन्याची वेळ : सकाळी ९ वा.

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button