breaking-newsक्रिडा

सॉफ्टबॉल स्पर्धा : पिंपरी चिंचवड, जळगाव, नागपूर संघांची विजयी सलामी

शारदा – गजानन चषक मुलींची राज्य अजिंक्‍यपद सॉफ्टबॉल स्पर्धा

पुणे – पिंपरी चिंचवड, जळगाव व नागपूर या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना आझम कॅम्पस येथे सुरू झालेल्या शारदा – गजानन चषक मुलींच्या राज्य अजिंक्‍यपद सॉफ्टबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली.
पिंपरी चिंचवड संघाने अमरावती शहर संघाला 10-2 असे पराभूत करताना विजयी पटकावला. पिंपरी चिंचवडच्या सलोनी कांबळे, श्रुती जगदाळे यांनी प्रत्येकी 2 होमरन्स करताना संघाला विजय मिळवून दिला. ऋतुजा वागज, अस्मिता जगताप, अमिषा पाटील, साक्षी पुडेकर, ऋतुजा देवकाळे, धनश्री सनकर यांनी प्रत्येकी 1 होमरन्स केला. अमरावती संघाकडून तेजस्विनी कुडाडे व धारा गायकवाड यांनी प्रत्येकी 1 होमरन करताना दिलेली लढत अपुरी ठरली.
जळगाव जिल्हा संघाने सांगली जिल्हा संघाला 10-0 असे एकतर्फी पराभूत करताना स्पर्धेत विजयी सलामी दिली.

जळगाव संघाच्या नेहा शिंदे व साक्षी देशमुख यांनी प्रत्येकी 2 होमरन्स केले. धनश्री माळी, समीक्षा राठोड, वैष्णवी शिंगटे, आरती माळी, दिव्या अहिरे, जागृती पाटील यांनी प्रत्येकी 1 होमरन करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. नागपूर शहर संघाने अमरावती जिल्हा संघाला 15 -0 असे एकतर्फी पराभूत करताना विजय साकारला. मयुरी सिंखेडे, मृणाल सानेश्वर, कांचन जयवाडे, निधी खामकर, जानिशा हासोरीया व वेदांती वाकुलकर यांनी प्रत्येकी 2 होमरन्स करताना संघाला विजय मिळवून दिला. खुशी झालवार, अनुष्का सहार व भावना आसोळे यांनी प्रत्येकी 1 होमरन केली.

तत्पूर्वी स्पर्धेचे उदघाटन एमसीई सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमसीई सोसायटीचे सचिव लतीफ मगदूम, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष अण्णा थोरात, जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव गजानन पंडित, महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव प्रदीप तळवेलकर, आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य गफ्फार सय्यद, प्रशांत जगताप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी बजावणाऱ्या दीक्षा पिल्लई, शुभदा जगदाळे, अल्फाराह मेमन, पल्लवी पिल्लई व फिझा सय्यद यांना सन्मानचिन्ह व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button