breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का…दुखापतीमुळे इशांत शर्मा संघातून बाहेर

भारत आणि न्यूझीलंडमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. दुसरा कसोटी सामना २९ फेब्रुवारी रोजी ख्राइस्टचर्च येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा जलद गोलंदाज इशांत शर्माला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो या सामन्यातून बाहेर होऊ शकतो. दुखापत झाल्यामुळे इशांत शर्मा शुक्रवारी सरावा सत्रातही सहभागी झाला नव्हता. 

इशांत शर्माच्या जागी उमेश यादवला या सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. इशांतला दिल्लीकडून खेळल्या जाणाऱ्या रणजी सामन्या दरम्यान दुखापत झाली होती. इंशात शर्मा या सामान्यात खेळणार नसल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा १०  विकेटनी पराभव झाला होता.  

दरम्यान, उमेश यादव हा कसोटी संघाचा एक भाग आहे आणि या सामान्यामध्ये त्याचे खेळणे जवळजवळ निश्चित झाले आहे.दरम्यान  इशांत शर्माच्या बाहेर पडल्यामुळे किवी संघालाही मोठा फायदा होऊ शकतो. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button