breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

संघात समावेश होताच पृथ्वी शाॅने काढल्या 35 चेंडूंत 48 धावा…

भारतीय निवड समितीने न्यूझीलंड विरुद्ध वनडे संघात पृथ्वी शॉची निवड केली होती. आणि त्याने या संधीची नक्कीच सोन केलं… पृथ्वीने भारत अ संघाकडून ३५ चेंडूंत ४८ धावा काढल्या. या शानदार खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या अनधिकृत वनडेत न्यूझीलंड अ संघाला पाच गड्यांनी हरवले. मुंबईच्या २० वर्षीय पृथ्वी शॉला मंगळवारी जखमी शिखर धवनच्या जागी वनडे संघात स्थान देण्यात आले. पृथ्वीने न्यूझीलंड अ विरुद्ध सराव सामन्यात १०० चेंडूंत १५० धावा ठोकल्या होत्या.

भारत व न्यूझीलंड यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका ५ फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. पृथ्वीला अंतिम अकरात संधी मिळाल्यास त्याचे वनडेतील पदार्पण ठरेल. त्याने १५ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही. अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०१८ मध्ये वेस्टइंडीज विरुद्ध कसोटी खेळली होती. तीन अनधिकृत वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारत अ संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले.

भारताने २९.३ षटकांत ५ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. पृथ्वी शॉसह संजू सॅमसनने २१ चेंडूंत ३९ आणि सूर्यकुमार यादवने १९ चेंडूंत ३५ धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलने ३० धावांची खेळी केली. सॅमसनचा धवनच्या जागी टी-२० मध्ये समावेश करण्यात आला. दुसरा अनधिकृत वनडे शुक्रवारी व तिसरा रविवारी खेळवण्यात येईल. अाता या मालिकेमध्ये दमदार खेळी करण्याचा पृथ्वीचा प्रयत्न असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button