Breaking-newsक्रिडा
वेटलिफ्टर संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/sanjita-chanu.jpg)
नवी दिल्ली : गेल्या महिन्यात पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी वेटलिफ्टर संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आहे. यामुळे संजिता चानूला आपलं सुवर्णपदक गमवावं लागण्याची शक्यता आहे.
संजिता चानूने गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये ५३ किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा पराभव करत भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनकडून संजिता चानूवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तिच्या नमुन्यात टेस्टॉस्टेरॉनचे अंश सापडले आहेत. संजिताकडून हा नमुना कधी घेण्यात आला होता याची माहिती अजूनही मिळालेली नाही.