breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआय त्या ऐवजी आयपीएलचं आयोजन करू शकते…

जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका बीसीसीसीआय सह बहुतांश क्रिकेट बोर्डांनाही बसला. बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. त्यामुळे होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आयसीसीने खेळाडूंना सराव करण्यासाठी नियमावली आखून दिली आहे.

काही देशातील खेळाडूंनी यानुसार सरावाला सुरुवातही केली आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावर टांगती तलवार आहे. ऑस्ट्रेलियात कोरोनाचा सामना करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यामुळे यानंतर मिळणाऱ्या अल्प कालावधीत विश्वचषकासारखी स्पर्धा आयोजित करणं हे धोक्याचं ठरु शकतं. म्हणूनच या स्पर्धेचं आयोजन पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे.

विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआय या जागेवर आयपीएल खेळवण्याच्या विचारात आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डासह काही माजी खेळाडूंचा याला विरोध आहे. अशा परिस्थितीत विंडीजचे माजी दिग्गज खेळाडू मायकल होल्डिंग बीसीसीआयची पाठराखण करण्यासाठी धावून आले आहेत. टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला आयपीएलचं आयोजन करण्याचा अधिकार असल्याचं होल्डिंग यांनी म्हटलं आहे.

आयपीएलचा तेरावा हंगाम रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागणार आहे. यासाठीच बीसीसीआयने अद्याप पूर्णपणे स्पर्धा रद्द केलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button