breaking-newsक्रिडा

विश्वचषकानंतर धोनी निवृत्त होणार?

इंग्लंड आणि वेल्स येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. येथे सुरू असलेलल्या विश्वचषक स्पर्धेनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चा आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, धोनीने १४ जूलै म्हणजेच विश्वचषकाचा अंतिम सामन्यादिवशी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी किंवा बीसीसीआयने याबाबात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, पीटीआयने बीसीसीआयमधील आधिकाऱ्याचे हवाल्याने धोनी विश्वचषकामध्ये आपला अखेरचा सामना खेळणार असल्याचे वृत्त दिले आहे.

धोनीने भारतीय संघाला आयसीसीच्या तिन्ही प्रकारात खिताब जिंकून दिला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी, टी-२० विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक भारताला जिंकून देण्यात धोनीचा मोलाचा वाटा आहे. अचूक निर्णयक्षमता पाहता धोनी विश्वचषकानंतर भारतीय संघात खेळताना दिसण्याची शक्यता धूसूर आहे. मात्र, चेन्नई संघाकडून धोनी आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे.

सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत संथ फलंदाजीमुळे धोनीवर माजी खेळाडू आणि क्रीडा विश्लेषकांनी टीका केली आहे. धोनीने आठ सामन्यात दोन अर्धशतकांच्या मदतीने २२३ धावा केल्या आहेत.

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय निवड समितीने विचार सुरू केला आहे. त्याची प्रक्रिया नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. निवडसमितीने धोनीचा पर्याय शोधण्यास सुरूवात केली आहे. २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय निवड समितीने धोनीला विश्वचषकात संधी देण्याचा निर्णय़ घेतला होता.

धोनीला निवृत्ती घेण्याबाबात कोणीही सांगू शकत नाही. मात्र, धोनी स्वत: निर्णय घेण्यास सक्षम आहे. तो लवकरच योग्य तो निर्णय घेईल असे बीसीसीआय़मधील एका आधिकाऱ्याने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button