breaking-newsक्रिडा

विराट कोहलीची विराट कामगिरी

  • सर्वात कमी सामन्यांत सर्वाधिक शतकी खेळी करण्याचा विक्रम 

राजकोट – वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने दमदार शतक ठोकले आहे. 184 चेंडूत त्याने ही विक्रमी कामगिरी केली. आतापर्यंत खेळलेल्या 72 व्या सामन्यांत विराटची ही 24 वी शतकी खेळी आहे. त्यामुळे भारतीय संघाकडून खेळताना सर्वात कमी सामन्यांत सर्वाधिक शतकी खेळी करण्याचा विक्रम विराटच्या नावावर झाला आहे. राजकोट येथे सुरू असणार्या कसोटी सामन्यात विराटने 24 वे शतक साजरे करताना वीरेंद्र सेहवागला (23 शतक) मागे टाकले आहे.

दुसरे वेगवान शतक 
विक्रमांचा विचार केला तर विराटने सर्वात कमी डावांत (123) 24 शतक फटकावण्याची कामगिरी केली आहे. त्याने सचिन तेंडुलकर (125) आणि सुनील गावस्कर (128) यांना मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या कामगिरीचा विचार करता केवळ डॉन ब्रॅडमनच विराटच्या पुढे आहेत. त्यांनी केवळ 66 डावांत 24 कसोटी शतके ठोकली होती. शतकी खेळींचा विचार करता विराटने आणखी एक विक्रमी टप्पा गाठला आहे. भारतासाठी भारतीय मैदानांवर खेळताना त्याने 3 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी त्याने केवळ 53 डावांत केली आहे.

पुजाराच्या विक्रमाशी बरोबरी 
भारताकडून पुजाराने 53 डावांत 3 हजार धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली होती. याच सर्वाधिक कमी डावांत 3 हजार धावा पूर्ण करण्याच्या भारतीय विक्रमाशी विराटने बरोबरी साधली आहे. घरच्या मैदानावर वेगवान 3 हजार धावा पूर्ण करण्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम डॉन ब्रॅडमन यांच्याच नावे आहे. त्यानी 37 डावांत ही कामगिरी केली होती. दुसर्या क्रमांकावर जावेद मियांदाद आणि स्टिव्ह स्मिथ (49) हे आहेत. त्यानंतर 51 डावांत गॅरी सोबर्स, मोहम्मद युसुफ, मॅथ्यू हेडन आणि 53 डावांत विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि ब्रायन लारा यांचा क्रमांक लागतो. नुकताच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातही विराट चांगलाच फॉर्ममध्ये दिसला. कसोटीच्या 10 डावांत त्याने 593 धावा जमवल्या होत्या. या कामगिरीसह विराट या दौऱ्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. तसेच 2018 मध्ये आतापर्यंत विराटने 1000 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button