breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

विराटला कर्णधारपदावरून हटवा, गौतम गंभीर संतापला

अबुधाबी – विराट कोहलीच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आरसीबी आयपीएल जिंकू शकली नाही. आयपीएल 2020 च्या एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 6 विकेट्सने पराभव केला. या पराभवानंतर विराट कोहलीवर टीका होऊ लागली आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनं तर विराटला कर्णधारपदावरुन हटवण्याची मागणी केली आहे.

गौतम गंभीर आयपीएलमधील विराटच्या कामगिरीवर नाराज आहे. गौतम गंभीर म्हणाला की, विराट कोहलीला आता कर्णधार पदावरुन हटवायला हवं. आठ वर्षापासून विराट संघाचा कर्णधार आहे. या आठ वर्षात त्यानं एकदाही संघाला आयपीएल जिंकून दिलेलं नाही. आठ वर्ष खूप जास्त आहेत, असं गंभीरनं म्हटलं आहे. गौतम गंभीर म्हणाला की, मला अशा कर्णधाराविषयी सांगा, कर्णधार सोडा अशा खेळाडूविषयी सांगा जो 8 वर्ष एखाद्या टीममध्ये आयपीएल जिंकल्याविना राहिला आहे.

रोहितचं केलं कौतुक
गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाइट रायडर्सने 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल जिंकली होती. गंभीर म्हणाला की, ‘कोहलीनं स्वत: पुढं येत हे मान्य करायला हवं की, तो कर्णधार म्हणून कमजोर आहे. आणि विजय मिळवून देऊ शकत नाही. तो म्हणाला की, किंग्स इलेवन पंजाबचं उदाहरण घ्या. अश्विन दो सिजनमध्ये जिंकू शकला नाही तर त्याला काढून टाकलं. रोहित शर्मा पाचव्यांदा मुंबई इंडियंसला विजेतेपदाच्या जवळ घेऊन गेला आहे. त्यामुळं तो कर्णधारपदासाठी योग्य आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button