breaking-newsक्रिडा

राहुल बाद होण्याचे नवे मार्ग शोधतो आहे : संजय बांगर

सिडनी  – भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी सुरू असलेल्या सराव सामन्यातही लोकेश राहुल अपयशी ठरल्या नंतर भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी त्याची कान उघडणी करत सांगितले की, राहुल हा दिवसागणीक बाद होण्याचे नवे नवे मार्ग शोधतो आहे.

चालू दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघातील सलामीवीर म्हणून लोकेश राहुलकडे पाहिले जाते आहे. तशी जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात येणार असल्याचे म्हटले जाते आहे. पण तो सध्या फॉर्मात नसल्याने संघव्यवस्थापन चिंतेत आहे. त्यात गुरुवारी सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तो अपयशी ठरला. यावेळी पाच फलंदाजांनी चमकदार कामगिरी करताना अर्धशतक झळकावले.

मात्र, राहुल पुन्हा अपयशी ठरला. यामुळेच संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी त्याची कानउघडणी करत त्याला जबाबदारीची जाणीव करून दिली. राहुल दिवसागणिक बाद होण्याचे नवे मार्ग शोधतो आहे की काय असे वाटू लागले आहे. अशा शब्दात बांगर यांनी राहुलला सुनावले आहे.

सिडनीत सुरु असलेल्या चार दिवसीय सराव सामन्यात फलंदाज बऱ्यापैकी धावा करत असताना राहुल चुकीचा फटका खेळत मिडऑफमध्ये झेल देत पॅव्हेलियनमध्ये परतला. यावेळी बोलताना बांगर म्हणाले की, राहुल फिट आहे, सुरुवात बरी करतो; पण का कोण जाणे तो प्रत्येकवेळी बाद होण्याचे नवे मार्ग शोधतो आहे की काय, असे वाटू लागले आहे.

सराव सामन्यातही त्याला बाहेरचा चेंडू फटकावण्याचा मोह आवरला नाही. मात्र त्यातल्या त्यात तो किमान सुरुवात चांगली करतो आहे ही समाधानाची बाब आहे. राहुल आता काही नवखा राहिलेला नाही. 30 कसोटी खेळला आहे, तेव्हा त्याला बऱ्यापैकी अनुभव आहे, त्याने जबाबदारीने खेळायला हवे, असे बांगर यांनी सांगितले.

तर, अजूनही सलामीवीर आणि सहाव्या क्रमांकावरिल फलंदाज ठरलेला नसल्याचे सुचवताना ते म्हणाले की, सराव सामन्यातील दुसऱ्या डावातील फलंदाजी बघून राहुल, मुरली विजय, रोहित शर्मा आणि हनुमा विहारी यांच्यातून सलामीवीर आणि सहाव्या क्रमांकाचा फलंदाज निवडला जाईल, अशी माहितीदेखील बांगर यांनी यावेळी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button