breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर, रोहीत शर्मा आणि कुस्तीपटू विनेश फोगट यांची मोहोर

नवी दिल्ली – राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाले असून भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्मा आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगट यांना हा पुरस्कार मिळाला आहे. रोहित आणि विनेश फोगाट यांच्याव्यतिरीक्त महिला टेबलटेनिसपटू मनिका बत्रा आणि पॅरालिम्पिकपटू मारियाप्पन थंगावेलू आणि हॉकीपटू राणी यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार मिळाला आहे. खेलरत्न मानाचा पुरस्कार मिळवणारा रोहित शर्मा चौथा क्रिकेटपटू आहे. २९ ऑगस्ट रोजी व्हर्चुअल पद्धतीने या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. सचिनला 1998 साली, धोनीला 2007 तर विराटला 2018 साली हा पुरस्कार मिळाला होता. मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत या रोहित, विनेश फोगाटसह अन्य दोन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. 2019 वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माने 5 शतकं झळकावत स्वतःला सिद्ध केलं होतं. त्यामुळे बीसीसीआयने त्याचं नाव खेलरत्न पुरस्कारासाठी दिलं होतं.

 द्रोणाचार्य पुरस्कार (लाइफ टाइम कॅटेगरी)

खेळाडूखेळ
धर्मेंद्र तिवारीआर्चरी
पुरुषोत्तम रायएथलेटिक्स
शिव सिंहबॉक्सिंग
कृष्ण कुमार हूडाकबड्डी
रमेश पठानियाहॉकी
नरेश कुमारटेनिस
विजय भालचंद्र मुनिश्वरपैरा पॉवर लिफ्टिंग
ओम प्रकार दाहियारेसलिंग

अर्जुन पुरस्काराचे मानकरी

खेळाडूखेळ
अतनु दासआर्चरी
दुती चंदएथलेटिक्स
सात्विक साईराजबैडमिंटन
चिराट शेट्टीबैडमिंटन
विशेषबास्केटबॉल
सूबेदार मानिक कौशिकबॉक्सिंग
लवलीनाबॉक्सिंग
इशांत शर्माक्रिकेट
दीप्ति शर्मामहिला क्रिकेट
सावंत अजयइक्विस्ट्रियन
संदेश झिंगनफुटबॉल
अदिति अशोकगोल्फ
आकाशदीप सिंहहॉकी
दीपिकाहॉकी
दीपककबड्डी
सारिका सुधाकरखो-खो
दत्तू बबनरोइंग
मनु भाकरशूटिंग
सौरभ चौधरीशूटिंग
मधुरिका सुहासटेबल टेनिस
दिविज सरनटेनिस
शिवा केशवनविंटर स्पोर्ट्स
दिव्या काकरनरेसलिंग
राहुल अवारेरेसलिंग
सुयश नारायण जाधवपैरा स्वीमिंग
संदीपपैरा एथलेटिक्स
मनीष नरवालपैरा शूटिंग
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button