breaking-newsआंतरराष्टीयक्रिडा

भालाफेकपटू नीरज चोप्रा डायमंड लिगच्या अंतिम फेरीत

झ्युरिच – भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने मानाच्या डायमंड लिग स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 30 ऑगस्ट रोजी झ्युरिच येथे ही स्पर्धा रंगणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतल्या कामगिरीची पुनरावृत्ती करत मोरोक्कोच्या राबात शहरात झालेल्या स्पर्धेत नीरजने 83.32 मीटर लांब भाला फेकताना चार डायमंड पॉईंट कमावत पाचवं स्थान पटकावलं. या कामगिरीच्या जोरावर नीरजला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे.
नीरज चोप्रा व्यतिरीक्त जागतीक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला जोहान्स व्हेटर, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता थॉमस रोहलर, 2017चा डायमंड लिग चॅम्पियन जेकब वाड्‌लेच, जर्मनीचा अव्वल खेळाडू अँड्रेस हॉफमन आणि इस्टोनियन रेकॉर्ड होल्डर मॅग्नस किर्ट या दिग्गज खेळाडूंनीही अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. यामुळे अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रासमोर कडवं आव्हान असणार आहे.
राबात शहराता झालेल्या या फेरीपूर्वी नीरजने डायमंड लिगच्या दोन फेऱ्यांमध्ये भाग घेतला होता ज्यातील दोहा येथिल स्पर्धेत पाच डायमंड पॉईंट्‌स कमावताना चौथे स्थान मिळवले होते. यावेळी त्याने तब्बल 87.43 मीटर लांबवर भाला फेकताना अव्वल दर्जाची कामगीरी नोंबवीली होती. तर युजीन (अमेरिका) येथे झालेल्या स्पर्धेत तीन डायमंड कमावताना सहावे स्थान मिळवले होते. डायमंड लिगही भालाफेकीतील मानाची स्पर्धा समजली जाते ज्यात 14 फेऱ्यांमधील गुण ग्राह्य धरले जातात. या 14 फेऱ्यांमध्ये पहिल्या आठ स्थानांवर राहिलेल्या खेळाडूंना बक्षिस दिले जाते. ज्यात पहिल्या स्थानी असलेल्या खेळाडूला 10,000 अमेरिकन डॉलर मिळतात तर आठव्या क्रमांकावरिल खेळाडूला 1000 अमेरिकन डॉलरचे बक्षिस दिले जाते. तर अंतीम सामन्यात आठव्या स्थानी असलेल्या खेळाडूला 2000 अमेरिकन डॉलर चे बक्षीस दिले जाते तर पहिल्या स्थानी असलेल्या खेळाडूला 50,000 अमेरिकन डॉलरचे बक्षीस दिले जाते.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button