breaking-newsक्रिडा

भारताच्या सगळ्यात वृद्ध क्रिकेटपटू वसंत रायजी यांचे निधन

मुंबई : भारताच्या सगळ्यात वयोवृद्ध क्रिकेटपटूचं निधन झालं आहे. १००व्या वर्षी वसंत रायजी यांनी अखेरचा श्वास घेतला. १९४०च्या दशकात वसंत रायजी यांनी ९ प्रथम श्रेणी मॅचमध्ये २७७ रन केल्या होत्या. रायजी यांनी मुंबईकडून खेळताना रणजी ट्रॉफीमध्ये बडोद्याविरुद्ध इनिंगची सुरुवात केली होती. १९४१ सालच्या बॉम्बे पेंटेंगुलरच्या हिंदूज टीमचे ते राखीव खेळाडू होते. 

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रायजी यांनी लिखाण केलं. रायजी पेशाने सीए होते. २०१६ साली बीके गुरुदाचार यांच्या निधनानंतर रायजी देशातले सगळ्यात वयस्कर प्रथम श्रेणी क्रिकेटपटू बनले. यावर्षी २६ जानेवारीला रायजी यांनी त्यांचा १००वा वाढदिवस सारजा केला. रायजी यांच्या १००व्या वाढदिवसाला सचिन तेंडुलकर आणि स्टीव्ह वॉ यांनी त्यांची भेट घेतली होती. 

७ मार्चला जॉन मॅनर्स यांच्या निधनानंतर रायजी जगातले सगळ्यात वयोवृद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटपटू बनले होते.सचिन तेंडुलकरनेही रायजी यांच्या निधनानंतर ट्विटरवरून श्रद्धांजली दिली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button