Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

भारताची धावपटू हिमा दासची सुवर्णझेप, आणखी एक नवा विक्रम

नवी दिल्ली – भारताची धावपटू हिमा दासनं शनिवारी (20 जुलै) आणखी एक सुवर्णपदकं (Gold Medal) पटकावलं. तिनं चेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टो नाड मेटुजी ग्रांप्रीमध्ये महिलांच्या 400 मीटर स्पर्धेत पहिलं स्थान मिळवलं. हिमानं 52.09 सेकंदांमध्ये हे अंतर पूर्ण केलं. तिनं ट्विट करत याची माहिती दिली.

हिमानं एकाच महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल 5 सुवर्णपदकं जिंकण्याचा विक्रम केलाय. हिमानं 3 जुलै रोजी युरोपमध्ये, 7 जुलै रोजी कुंटो अॅथलेटिक्स मीटमध्ये, 13 जुलै रोजी चेक प्रजासत्ताकमध्ये आणि 17 जुलैला टाबोर ग्रांप्रीमध्ये अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हिमाच्या या सुवर्ण घोडदौडीचे जगभरातून कौतुक होत आहे. सिनेकलाकारांपासून अनेक राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही हिमाचं विशेष कौतुक केलं आहे. तसंच तिचा देशाला अभिमान असल्याचं सांगितलं.

चेक प्रजासत्ताकमधील या स्पर्धेत इतर भारतीय धावपटूंनीही चमक दाखवली. यात दुसऱ्या स्थानावरही भारतीय धावपटू व्ही. के. विस्मया होती. विस्मयानं 52.48 सेकंदांमध्ये ही धाव पूर्ण केली. तिला हे 400 मीटर अंतर पूर्ण करण्यासाठी हिमापेक्षा 5.3 सेकंद अधिक लागले. तिसऱ्या क्रमांकावर सरिता बेन गायकवाड ही धावपटू होती. तिनं 53.28 सेकंदांमध्ये अंतर पूर्ण केलं.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button