breaking-newsक्रिडा

बारामतीच्या सतीश ननवरे यांना आयर्नमनचा किताब

जळोची– बारामती सायकल क्‍लबचे सदस्य सतीश ननवरे यांनी ऑस्ट्रियात होणाऱ्या आयर्नमन 2018 ही मॅरेथॉन स्पर्धा जिंकत आयर्नमनचा किताब जिंकुन बारामतीच्या नावलौकिकात भर पाडली असून त्यांच्या या कामगीरी मुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

ऑस्ट्रियात येथे झालेल्या आयर्नमन 2018 या स्पर्धेमध्ये त्यांनी 3.8 कि.मी. पोहणे, 180 कि.मी. सायकलिंग आणि 42:200कि.मी. मॅरेथॉन असा प्रवास 12 तास 33 मिनिट 45 सेकंदांमध्ये पूर्ण करत आयर्नमनचा किताब पहिल्यांदाच बारामती आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला मिळवून दिला आहे.

6 तासात 4 किमी जलतरण, 180 किमी सायकलिंग आणि 42 किमी धावणे अशे या “आयर्नमन’ स्पर्धेचे स्वरूप असते ही स्पर्धा दरवर्षी ऑस्ट्रियात 1 जुलै रोजी भरवली जाते या स्पर्धेत भाग घेणारे सतीश ननावरे हे ग्रामीण भागातून सहभागी होणारे पहिलेच स्पर्धक होते. स्वत:चा व्यवसाय सांभाळत एखाद्या ध्येयपूर्तीसाठी धडपडणारी माणसं बोटावर मोजण्याइतकीच असतात. गेल्या वर्षभरापासून बारामतीतील सतीश ननवरे हे “आयर्नमन’ स्पर्धेची तयारी करत होते. ते गेल्या सव्वा ते दीड वर्षांपासून या स्पर्धेची तयारी करत होते.

ज्यात शारीरिक आणि मानसिक संतुलन राखत निराश न होता आपल्या कामगीरीत सुधारणा करण्याची महत्वपूर्ण तयारी त्यांनी केली. त्यातच त्यांनी आपल्या आहारातही मोठ्या प्रमाणात बदल केले होते. त्याचबरोबर स्पर्धेसाठी दिलेल्या वेळेच्या आधी संपूर्ण अंतर पूर्ण व्हावं या उद्देशानं त्यांनी अधिक प्रमाणात ते मेहनत घेत होते. तरुणांनी आणि व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सांभाळूनही अशा स्पर्धा पूर्ण करता येऊ शकतात हे दाखवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचबरोबर ही स्पर्धा पूर्ण करण्याची त्यांची जिद्द होती. ही स्पर्धा जिंकल्यानंतर यापेक्षा आणखी मोठं आव्हान असलेल्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तयारी करणार असल्याचंही त्यांनी सांगितल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button