फिफा विश्वचषक : स्वित्झर्लंडचा सर्बियावर विजय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Swiss-win-over-Serbia.jpg)
कॉलिनिनग्राड -अत्यंत रोमहर्षक लढतीत स्वित्झर्लंडने सर्बियावर 2-1 अशी मात केली. अखेरच्या काही मिनिटांत जेडरान शकीरीने केलेल्या गोलच्या सहाय्याने स्वित्झर्लंडने सर्बियाचा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीच्या 5 मिनिटांतच अलेक्झांडर मित्रोविचने गोल करत सर्बियासाठी चांगली सुरुवात करून दिली होती. सर्बियाने 1-0 अशी आघाडी घेतली होती. नंतर 52 व्या मिनिटाला स्वित्झर्लंडच्या ग्रेनिट जाकाने गोल करत बरोबरी साधली.
मध्यंतरापर्यंत 0-1 ने पिछाडीवर असलेल्या स्वित्झर्लंडने सामन्यात पुनरागमन करत सर्बियावर 2-1 ने मात केली. पिछाडीवर असलेल्या संघाने पुनरागमन करत प्रतिस्पर्धी संघावर मात केल्याची यंदाच्या वर्ल्डकपमधील ही पहिलीच वेळ आहे. ग्रेनिट जाका आणि शाकिरी या दोघांमुळे स्वित्झर्लंडला हा विजय मिळाला.
शाकिरीने 90 व्या मिनिटाला नोंदवलेल्या गोलच्या जोरावर स्वित्झर्लंडने सर्बियाचा 2-1 ने पराभव करत इ गटात दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. याआधी सुरुवातीला सर्बियाच्या ऍलेक्झॅंडर मिटरोव्हिकने सामना सुरु झाल्यानंतर 5 व्याच मिनिटाला गोल नोंदवित संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर त्यांनी ही आघाडी मध्यंतरा पर्यंत टिकवून ठेवण्यात यशही मिळवले. मॉस्कोतील कॅलिनीग्राड स्टेडियममध्ये शुक्रवारी रात्री स्वित्झर्लंड विरुद्ध सर्बिया हा सामना पार पडला. दोन्ही देशांकडे फारसे नावाजलेले खेळाडू नसले तरी दोन्ही संघांचा सध्या फॉर्म पाहता लढत अटीतटीची होणार, असे दिसत होते. या दोन्ही संघांचा इतिहास पाहता पारडे सर्बियाच्या बाजूने झुकत होते. अपेक्षेनुसार सामन्याच्या चौथ्या मिनिटालाच सर्बियाच्या मित्रोविचने गोल मारत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
मात्र, मध्यंतरानंतर स्वित्झर्लंडने आक्रमक खेळ केला. त्यांच्या ग्रॅनिट झाकाने 53 व्या मिनिटाला गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेत अखेरच्या मिनिटाला शाकिरीने गोल नोंदवित स्वित्झर्लंडला विजय मिळवून दिला. इंज्युरी टाईममध्ये सर्बियाने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, पण स्वित्झर्लंडच्या बचावपटूंनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. सर्बियाचे खेळाडू मैदानावरील हालचालीत अधिक तेज असतात. त्याचा फायदा सर्बियाला झाला असता. पण अतिआक्रमकपणा आणि मोक्याच्या क्षणी केलेल्या चुकांमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यापूर्वी स्वित्झर्लंडसोबत झालेल्या 13 सामन्यांमध्ये सर्बिया केवळ दोन वेळाच पराभूत झाला होता.