breaking-newsक्रिडा

झेल घेताना चेंडू नाकावर आदळला, फिल्डर रक्तबंबाळ

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या मार्श कप स्पर्धा सुरू आहे. या देशांतर्गत स्पर्धेत अनेक चांगले-वाईट प्रसंग रोज घडताना दिसत आहेत. या स्पर्धेत रविवारी साऊथ ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला. या सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या अ‍ॅश्टन अगारला साऊथ ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या त्याच्या भावाचा झेल घेताना मोठी दुखापत झाली.

सामन्यात साऊथ ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु होती. ४१ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अ‍ॅश्टनचा भाऊ वेस अगार याने हवेत एक फटका लगावला. तो झेल पकडण्यासाठी अ‍ॅश्टनने प्रयत्न केला. मात्र चेंडू त्याच्या हातात आला नाही. चेंडू थेट त्याच्या नाकावर आदळला आणि त्याला चांगलीच दुखापत झाली. चेंडू नाकावर लागल्यानंतर अ‍ॅश्टन खाली पडला आणि त्याच्या नाकातून रक्त वाहू लागले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button