ज्या मुलीने केला होता बलत्काराचा आरोप, तिच्याशीच केलं भारताच्या ‘ या ‘ खेळाडूने लग्न
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/gosh_201808117658.jpg)
ठळक मुद्देया खेळाडूला आता ऑलिम्पिकचे वेध लागले आहेत. पण हे प्रकरण सुरु झाल्यापासून त्या खेळाडूला सराव करता आलेला नाही.
नवी दिल्ली : चार महिन्यांपूर्वी ‘ तिने ‘ एका भारतीय खेळाडूवर बलात्काराचा आरोप केला होता. हा आरोप अशा वेळी करण्यात आला की त्यावेळी ‘ तो ‘ खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला जायच्या तयारीत होता. पण ‘ त्या ‘ मुलीने आरोप केल्यामुळे त्याचे संघटनेने निलंबन केले आणि त्याला स्पर्धेला मुकावे लागले. पण आता ‘ त्या ‘ मुलीबरोबर भारताच्या ‘ या ‘ खेळाडूने लग्न केल्याची बाब समोर आली आहे.
बलात्काराचा आरोप करणाऱ्या मुलीशी लग्न केल्यावर ती याचिका मागे घेईल. त्यानंतर क्रीडा संघटनाही खेळण्यास परवानगी देईल आणि ऑलिम्पिकच्या तयारीला सुरुवात करू शकू, असे या खेळाडूने विचार केला. आता तुम्ही विचार करत असाल हा भारताचा खेळाडू नेमका कोण, तर तो खेळाडू आहे भारता टेबल टेनिसपटू सौम्यजित घोष.