Breaking-newsक्रिडा
जेव्हा भारताचा ‘हा’ महान खेळाडू ‘पेले’ यांना भेटतो तेव्हा…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/pele-bhu.jpg)
भारताचा महान फुटबॉलपटू बायचुंग भुतिया याने सार्वकालीन महान फुटबॉलपटू पेले यांची भेट घेतली. यानंतर त्याने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर फोटो ट्विट केला. यामध्ये त्याने लिहले आहे की, ” एक महान खेळाडूला भेटणे हे नेहमीच आनंददायी असते. मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे तर पाहायला विसरू नका”
पेले यांना फुटबॉलमधील सार्वकालीन महान खेळाडू म्हणून ओळखले जाते. १९५८ मध्ये त्यांनी ब्राझीलच्या राष्ट्रीय संघात विश्वचषक स्पर्धेच्यावेळी पदार्पण केले. उपांत्यफेरी आणि अंतिम लढतीत त्याने जादुई खेळ करत ब्राझीलला विश्वचषक जिंकून दिला. त्यानंतर देखील त्यांनी दोन विश्वचषक जिंकले. त्यामुळे त्यांची सार्वकालीन महान खेळाडूंमध्ये गणना होते. त्यांच्या जीवनावर आधारित ‘पेले’ हा चित्रपट मागील विश्वचषकाच्यावेळी प्रदर्शित झाला होता. त्याला देखील उत्तम यश मिळाले आहे.
बायचुंग भुतिया हा भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार होता. त्याने भारताचे अनेक स्पर्धांमध्ये ८४ सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. भारतीय फ़ुटबाँलच्या सर्वात प्रतिष्ठीत पाहिल्या तीन खेळाडूंमध्ये त्याचे नाव घेतले जाते. तो विदेशी क्लबसाठी खेळणारा भारताचा दुसरा खेळाडू होता. भारतमध्ये फुटबॉलला वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांचे खूप महत्वाचे योगदान आहे. भारताच्या फ़ुटबाँलच्या विकासासाठी तो सातत्याने प्रयत्न करत असतो . त्याने फुटबॉल स्कूल देखील सुरु केले आहे आणि त्याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.