Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
खेळाडूंनी मॅच फिक्सरपासून सावध राहावे – ICC
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/icc-logo.jpg)
लंडन | संपूर्ण जगात हाहाःकार माजवलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील खेळांवर परिणाम पडला आहे. जगातील एकतृतींश लोकसंख्या कोरोनामुळे आपल्या घरात कैद झाली आहे. दरम्यान, इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल (आयसीसी)ने सर्व खेळाडूंना फिक्सर्सपासून सावधान राहण्याचे सांगितले आहे.
आयसीसीच्या अँटी-करप्शन डिपार्टमेंटचे चीफ एलेक्स मार्शलने शनिवारी याबाबत माहिती दिली. एलेक्स म्हाले, ”कोविड-19 मुळे जगभारातील आंतरराष्ट्रीय, डोमेस्टीक क्रिकेटसह सर्व खेळ टूर्नामेंट अनिश्चित काळासाठी स्थिगित करण्यात आले आहेत. पण, भ्रष्टाचारी लोक आताही सक्रिय आहेत. आता आम्ही सर्व खेळाडू, असोसिएशन आणि एजेंट्सला याबाबत माहिदी देण्याचे काम करत आहोत. आम्ही या सर्वांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत.”