breaking-newsक्रिडा

क्रिकेटमधील निवृत्‍तीनंतर धोनीचे मनोरंजन क्षेत्रात पाऊल

मुंबई – भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने 15 ऑगस्टला क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता महेंद्रसिंग धोनी हा मनोरंजन आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. त्यासाठी त्याने बानीजय आशिया प्रोडक्शन हाऊस आणि दीपक धर यांचे इंडेमॉल शाईन या दोन कंपन्यांशी करार केले असून धोनीने जुलै महिन्यातच मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे ‘अदानी इन्स्पायर’ या इमारतीत कार्यालय थाटले आहे. धोनीच्या कंपनीचे नाव आहे ‘धोनी इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड.’

या कार्यालयाचे भाडे दरमहा 1 लाख 89 हजार रुपये आहे. अदानी इन्स्पायर या इमारतीतील दुसऱ्या माळ्यावरील 207 क्रमांकाचे दालन धोनीने आपल्या कार्यालयासाठी भाड्याने घेतले आहे. धोनीने हे कार्यालय मार्च महिन्यात भाड्याने घेतले. त्यानंतर या कार्यालयाचे नूतनीकरण आणि सजावट सुरू होती. निवृत्तीनंतर धोनी मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकणार आहे आणि चित्रपट, मालिका व वेब सिरीज निर्माण करणार आहे. सुशांत सिंह राजपूत यांनी भूमिका साकारलेल्या व धोनीच्या जीवनावर आलेल्या चित्रपटानंतर धोनीने मनोरंजन विश्वास पदार्पण करण्याचे ठरविले होते. त्याच्या धोनी इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत त्याची पत्नी साक्षी सिंग धोनी आणि सुरज सिंग हे डायरेक्टर आहेत. धोनीने अंधेरीतील हे कार्यालय गुरविंदर सिंग, सतविंदर कौर आणि गुरमित सिंग यांच्याकडून भाड्याने घेतलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button