breaking-newsक्रिडा

कौशल, आर्य, रिषभ, विनीत चौथ्या फेरीत

  • राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा

पुणे: मुंबईच्या अग्रमानांकित कौशल धर्मामेरसह आर्य भिवपाटकर, रिषभ देशपांडे, विनीत कांबळे, अमेय ओक व अभिषेक कुलकर्णी या पुण्याच्या प्रमुख खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करताना राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत धडक मारली. तसेच मुंबईच्या नायगेल डिसानेही चौथी फेरी गाठली.

बारामती येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत कौशल धर्मामेर या महाराष्ट्राच्या प्रथम मानांकन असलेल्या खेळाडूने धनंजय मानेवर 21-8, 21-6 अशी सहज मात करताना चौथ्या फेरीत धडक मारली. आज दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत अत्यंत अटीतटीचे सामने झाले. मानांकित खेळाडूंनी आपापल्या गटात पुढची फेरी गाठताना स्पर्धेत रंगत आणली. महिलांच्या एकेरी व दुहेरीतही अत्यंत चुरशीचे सामने झाले. शुभांगी मुजुमदार व प्रियांका पिल्ले यांनी एकेरीत, तर आदिती काळे व रिया जाईल, तसेच नमिता शेट्टी व शुभांगी मुजुमदार या जोड्यांनी महिला दुहेरीत विजयी आगेकूच केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button