कोलकाताला आज अखेरची संधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/srh-vs-kkr.jpg)
हैदराबाद – आयपीएलच्या अकराव्या हंगामात प्ले-ऑफमधील स्थानासाठी झगडणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्ससमोर आज रंगणाऱ्या सामन्यात बाद फेरीत सर्वात आधी स्थान पटकावणाऱ्या सनरायजर्स हैदराबादचे आव्हान आहे.समतोल संघ असतानाही हंगामाच्या सुरुवातीला वर्चस्व गाजवणाऱ्या परंतु आता बाद फेरीत पोहोचण्यासाठी झगडणाऱ्या कोलकाताने आजच्या सामन्यात विजय मिळवला तरच ते बाद फेरीत पोहोचतील.
कोलकाताने आतापर्यंत आपल्या 13 पैकी सात सामन्यात विजय मिळवला आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये त्यांची फलंदाजी सुधारली असून सुनील नारायण, ख्रिस लिन, दिनेश कार्तिक व नितीश राणा यांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. तर सुनील नारायण, कुलदीप यादव, पियुष चावला, शिवम मावी, मिचेल जॉन्सन यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला दडपणाखाली ठेवण्यात यश मिळवले आहे.
दुसरीकडे हैदराबादच्या संघाने पहिल्याच सामन्यापासून मालिकेत वर्चस्व गाजवले असून त्यांनी आपल्या 13 पैकी नऊ सामन्यांत विजय मिळवला आहे. मात्र गेल्या दोन सामन्यांतील पराभवाने त्यांचा संघ काहीसा दडपणाखाली आहे. संपूर्ण हंगामात गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीने त्यांना विजयी केले होते. मात्र गेल्या दोन सामन्यांत गोलंदाजांनी स्वैर मारा करताना प्रतिस्पर्धी संघास धावांची खैरात दिली होती. मात्र त्यांच्या फलंदाजांची चांगली कामगिरी ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे.
प्रतिस्पर्धी संघ –
सनरायजर्स हैदराबाद– केन विल्यमसन (कर्णधार), शिखर धवन, मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान सहा, सिद्धार्थ कौल, दीपक हूडा, खलील अहमद, संदीप शर्मा, युसुफ पठाण, श्रीवत्स गोस्वामी, रिकी भुई, बेसिल थंपी, टी. नटराजन, सचिन बेबी, विपुल शर्मा, मेहंदी हसन, तन्मय अग्रवाल, ऍलेक्स हेल्स, कार्लोस ब्रेथवेट, रशीद खान, शकीब अल हसन, मोहम्मद नबी व ख्रिस जॉर्डन.
कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक (कर्णधार), ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, आंद्रे रसेल, नितीश राणा, सुनील नारायण, कुलदीप यादव, पियुष चावला, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, मिचेल जॉन्सन, शुभमन गिल, विनय कुमार, रिंकू सिंग, कॅमेरॉन डेलपोर्ट, जेव्हन सिरलेस, अपूर्व वानखेडे, इशांक जग्गी व टॉम करन.
सामन्याचे ठिकाण- हैदराबाद, सामन्याची वेळ- रात्री 8 पासून.