breaking-newsक्रिडा

केशव महाराजने श्रीलंकेच्या नऊ फलंदाजांना धाडले माघारी

कोलंबो: फिरकी गोलंदाज केशव महाराज याने कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी 1957 नंतरची सर्वोत्तम कामगिरी करण्याचा पराक्रम केला. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 129 चेंडूंत 9 बळी मिळवले आहेत. अथक प्रयत्नानंतर त्याला अखेरची विकेट मिळवण्यात यश प्राप्त झाले. रंगना हेरथ आणि अकिला धनंजया यांनी 10व्या विकेटसाठी केलेल्या 74 धावांची भागिदारी त्याने संपुष्टात आणली. दक्षिण आफ्रिकेसाठी एका डावात 9 बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे.

श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिल्याच कसोटीत हार पत्करावी लागली. यानंतर कोलंबो येथे खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटीतही आफ्रिकेचा संघ चांगलाच अडचणीत सापडला आहे. मात्र आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आपली नोंद केली आहे. केशव महाराजने पहिल्या डावात श्रीलंकेचे तब्बल 9 बळी टिपले. 129 धावा देत केशव महाराजने श्रीलंकेचा अर्धाअधिक संघ माघारी धाडला.

या कामगिरीसह केशव महाराज आशिया खंडात सर्वाधिक बळी घेणारा बिगर आशियाई गोलंदाज ठरला आहे. केशवने वेस्ट इंडिजच्या देवेंद्र बिशूला मागे टाकलं आहे. श्रीलंकेने पहिल्या डावात केलेल्या 338 धावांना उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 124 धावांमध्ये गारद झाला. यानंतर दुसऱ्या डावात श्रीलंकेने 3 गडी गमावत 151 धावांपर्यंत मजल मारली आहे. दुसऱ्या डावातले 2 बळीही केशव महाराजच्याच नावावर जमा झाले आहेत, तर श्रीलंकेचा एक फलंदाज हा धावबाद झाला. दुसऱ्या दिवसाअखेरीस महाराजच्या नावावर 11 बळींची नोंद झालेली आहे.

आशियाई खंडात सर्वोत्तम कामगिरी केलेले बिगर आशियाई गोलंदाज
1. केशव महाराज : 9/129 (विरुद्ध श्रीलंका, कोलंबो कसोटी 2018)
2. देवेंद्र बिशू : 8/49 (विरुद्ध पाकिस्तान, दुबई कसोटी 2016)
3. नेथन लॉयन : 8/50 (विरुद्ध भारत, बंगळुरु कसोटी 2017)
4. लान्स क्‍लुसनर : 8/64 (विरुद्ध भारत, कलकत्ता कसोटी 1996)
5. स्टुअर्ट मॅकगिल : 8/108 (विरुद्ध बांगलादेश, फतुल्लाह कसोटी 2006)
6. जेसन क्रेझा : 8/215 (विरुद्ध भारत, नागपूर कसोटी 2008)
7. रे लिंडवॉल : 7/43 (विरुद्ध भारत, मद्रास कसोटी 1956)
8. जॉन लेव्हर : 7/46 (विरुद्ध भारत, दिल्ली कसोटी 1976)
9. इयान बोथम : 7/48 (विरुद्ध भारत, मुंबई कसोटी 1980)
10. हेडली व्हेर्टी : 7/49 (विरुद्ध भारत, मद्रास कसोटी 1934)

द. आफ्रिकेच्या गोलंदाजांची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी
ह्यूज टेयफिल्ड – 9/113 वि. इंग्लंड, जोहान्सबर्ग 1957
केशव महाराज – 9/129 वि. श्रीलंका, कोलंबो 2018
गॉडफ्रे लॉरेन्स – 8/53 वि. न्यूझीलंड, जोहान्सबर्ग 1961
लान्स क्‍युजनर – 8/64 वि. भारत, कोलकाता 1996
ह्यूज टेयफिल्ड – 8/69 वि. इंग्लंड, डर्बन 1957
टिप स्नूक – 8/70 वि. इंग्लंड, जोहान्सबर्ग 1906
ऍलन डोनाल्ड – 8/71 वि. झिम्बाब्वे, हरारे 1995

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button