आयसीसीचे क्रिकेटसाठी आता नवे नियम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/icc-logo-1-2100x1200-1.jpg)
नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी काळातील कोरोना व्हायरसची परिस्थिती लक्षात घेता क्रिकेटसाठी नवीन नियामावली आणि मार्गदर्शक तत्वे लागू केले आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरातील सर्व प्रकारचे क्रीडा सामने अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत.
क्रिकेटच्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. सर्व मोठ्या मालिकांवर कोरोनाचा परिणाम झाला आहे. काही देश भविष्यातील क्रिकेटचे सामने सुरु करण्यावर विचार करत आहे. त्याच प्रकारे आयसीसीही प्रयत्नरत आहे. याच अनुषंगाने आयसीसीने नवीन मार्गदर्शक तत्वांची घोषणा केली आहे. नवीन नियमावली आणि मार्गदर्शक तत्वे यांच्याबाबतीत अधिकृतरित्या दिलेल्या पत्रकात आयसीसीने स्पष्ट म्हटले आहे की, या सर्व नवीन नियमावलींचा आणि मार्गदर्शक तत्वांचा हेतू हा कोरोना व्हायरसच्या या जागतिक फैलावाच्या दुष्टचक्रातून सुरक्षितरित्या टप्प्या-टप्प्याने बाहेर पडणे व त्यानंतर मैदानावर परतणे हाच आहे. आयसीसीच्या आरोग्य सल्लागार समितीने अनेक आरोग्य विषयक तज्ज्ञांसोबत मिळून नवीन नियमावली आणि मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. यात क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेटशी संबधीत सर्व घटकांची सुरक्षितता कायम ठेवून पुन्हा क्रिकेट सुरु करण्याच्या दिशेने पाऊल टाकता येईल.
१. सुरक्षा सर्वात महत्त्वाची
आयसीसीने सामन्यादरम्यान सुरक्षेला प्राथमिकता देण्यास सांगितले आहे.
सामना खेळण्यास तेव्हाच परवानगी देण्यात यावी ज्यावेळी स्थानिक परिसरात संक्रमण होण्याचा कोणताही धोका नसेल.
कोणत्याही प्रशिक्षण शिबिरापुर्वी तेथील प्रत्येक गोष्टीची तपासणी करण्यात यावी. उदाहरणार्थ मैदान, खेळासंबधी उपकरणे, ड्रेसिंग रुम, इत्यादी. ही तपासणी प्रत्येक सत्रापुर्वी व्हावी.
२. स्थानिक सरकारचा सल्ला आणि परवानगी
३. सर्व क्रिकेट संघ, स्थानिक क्रिकेट प्रशासन आणि इतर अधिकृत संस्थांना स्थानिक सरकारशी सल्लामसलत करावी लागेल.